24.1 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रलोक हसत गेले, मी शिकत गेले

लोक हसत गेले, मी शिकत गेले

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मी खासदारकीची पाच वर्षे पूर्ण केली आणि दुस-या खासदारकीच्या टर्मसाठी मैदानात उतरले आहे, असे म्हणत नवनीत राणा यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

लोक आपल्यावर हसत होते, मराठी बोलता न येणारी व्यक्ती खासदार कशी होऊ शकते, असे म्हणत लोकांनी आपली खिल्ली उडवल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले आहे. तर राजकारणात पती रवी राणा यांनी मार्गदर्शन केल्याचेही नवनीत राणा यांनी सांगितले आहे. दुस-या खासदारकीच्या टर्मसाठी मी मैदानात उभी आहे, असे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. नेते मंचावर बसून माझी खिल्ली उडवत होते पण, ते लोक हसत गेले, मी शिकत गेले, असेही नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मी खासदारकीची पाच वर्षे पूर्ण केली आणि दुस-या खासदारकीच्या टर्मसाठी मैदानात उतरले आहे, असे म्हणत नवनीत राणा यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात नवनीत राणा यांनी सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे.

नवनीत राणा यांनी यावेळी म्हटले की, किती लोक हसत होते. काही लोक प्रेमामुळे हसत होते, पण नेते माझी गंमत करत होते. नेते मंचावर बसून माझी खिल्ली उडवत होते, या बाईला म्हणे साधं मराठी बोलता येत नाही, ती काय खासदार होणार? मी रवीजींना विचारलं की, नेते असे हसत आहेत, मी काय करू? तेव्हा त्यांनी सांगितलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय संघर्ष करा आणि तुझ्या संघर्षाची सुरुवात इथूनच आहे. याच संघर्षात तू खरी उतरली तर येणा-या भविष्यात तुला कुणीच रोखू शकत नाही, अशाप्रकारे राजकारणात पती रवी राणा यांनी मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ते लोक हसत गेले, मी शिकत गेले. ते लोक अजूनही हसत आहेत आणि मी खासदारकीची पाच वर्षे पूर्ण केली. मी खासदारकीची पाच वर्षे पूर्ण करून दुस-या खासदारकीच्या टर्मला या मैदानामध्ये उतरली आहे. महिलांनी कुणालाही घाबरण्याची गरज नाही. आम्ही आपल्या पायावर आत्मनिर्भर झाले पाहिजे, बाहेर पडून आपण काम केले पाहिजे, फक्त नव-यावर आणि कुटुंबावर कुणी बोट दाखवू नये याकडे लक्ष दिले पाहिजे, तेव्हा आपण कोणतंही काम करू शकतो असेही नवनीत राणा यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR