23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरलोकनेते स्व. बाबूराव आण्णा पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरेल

लोकनेते स्व. बाबूराव आण्णा पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरेल

मोहोळ : लोकनेते स्व. बाबूराव आण्णा पाटील यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात सुख समृध्दी आणण्याचे पाहिलेले स्वप्न अनगरसह नऊ गावांतील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मागी लागणार असल्याने सत्यात उतरेल, असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी येथे केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आणि आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यातून साकारत असलेल्या आष्टी उपसा सिंचन योजनेतून अनगर, देवडी, बाफळे, हिवरे, नालबंदवाडी, खंडोबाचीवाडी, कुरणवाडी (अ.), कोंबडवाडी, बडाचीवाडी, चिखली या गावांना शेतीच्या पाण्यासाठी वाढीव क्षेत्राच्या सर्वेक्षणाच्या कामाचा प्रारंभ शंकरनगर येथे झाला. त्याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी लोकनेते शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, अधीक्षक अभियंता भीमा कालवा मंडळ ज्ञानदेव बागडे, कार्यकारी अभियंता नारायण जोशी, उपअभियंता विनय नलावडे, मुख्याधिकारी नगरपंचायत अनगर डॉ. योगेश डोके, चेतक

एजन्सी पुणेचे साहेबराव गांगडे, पाणीपुरवठा ठेकेदार श्रीकांत सोनी, दादा बोडके, तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यकारी अभियंता जोशी यांनी प्रास्ताविकातून आष्टी उपसा योजनेतील सूक्ष्म सिंचनातून वाचलेल्या पाण्यातून ०.३५ टीएमसी पाणी या योजनेसाठी उपलब्ध होणार असून ३ हजार ६५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे सांगून १५ दिवसांत सव्हें पूर्ण करून प्रस्ताय शासनाकडे मंजुरीसाठी पाठवू असे सांगितले. आमदार माने म्हणाले की, आजचा हा दिवस अविस्मरणीय असून पुढील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवा त्या दृष्टीने आम्ही ही योजना तक्करच पूर्णत्वास नेत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR