मुंबई : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची ईडीने स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्ता अमेय तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. बीड प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे नाव सातत्याने समोर येत असल्याने पोलिस तपासाला मर्यादा येत असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
बीड प्रकरणाचा सध्या एसआयटी आणि सीआयडीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. त्याचसोबत निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून याची न्यायालयीन चौकशीही करण्यात येणार आहे. पण या प्रकरणात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे पोलिस तपासात मर्यादा येत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ईडीने स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्या संबंधित अनेक कंपन्यांचे व्यवहार, मालमत्तांची यादी समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात निवडणूक आयोगाला प्रतिवादी करावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असून त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.