धाराशिव : कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजित ंिपगळे हे विद्यमान आमदार कैलास पाटील यांच्या विरोधात ंिरगणात आहेत. भाजपातून शिंदे सेनेत प्रवेश करून अजित ंिपगळे यांनी उमेदवारी मिळवली खरी परंतु त्यांना अद्यापही आपण भाजपात
असल्यासारखेच वाटत आहे. कारण त्यांनी आजपर्यंतच्या प्रचारात भाजपा नेते राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे असलेले मुद्दे प्रचारात गिरवायला सुरू केले आहेत. त्यामुळे पिंगळे यांच्याकडे राणाजगजितसिंह पाटील यांचेच व्हिजन असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचाराची धुराही राणाजगजितंिसह पाटील हेच बघत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. पिंगळे यांच्या प्रचारात शिंदे सेनेपेक्षा भाजपाचेच कार्यकर्ते अधिक सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंगळे हे नेमके शिवसेनेचे की भाजपाचे हे अद्याप मतदारांना समजू शकत नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
कळंब विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेतील अनेकजण इच्छूक होते. परंतू पक्षाने भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुकाप्रमुख म्हणून असलेले अजित पिंगळे यांना पक्षात घेवून त्यांना ऐनवेळी शिवसेनेकडून धनुष्यबाणावर लढण्याची संधी दिली. त्यामुळे शिवसेनेतील अनेक इच्छूकांमध्ये मोठी नाराजी आहे. तसेच भाजपवासी झालेल्या ंिपगळे यांनाही भाजपतील लागलेला लळा सुटला नसल्याचे दिसून येते. त्याचे कारण म्हणजे शिंदे सेनेतील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिका-यांना डावलून पक्षाने पिंगळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेतील हे पदाधिकारी नाराज असून पिंगळे यांच्या प्रचारापासून दूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यामुळेच की काय खुद्द अजित पिंगळे यांनी जुन्या असलेल्या भाजपा सहका-यांचा आधार घेतला असावा असे बोलले जात आहे. भाजपा पदाधिका-याची त्यांचा प्रचाराचा गाडा हाकलत आहेत. पिंगळे हे भाजपाचा किती दिवस आधार घेणार आणि ज्या शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली त्या पक्षाच्या पदाधिका-यांसोबत न राहणे हे पक्षासाठी फायद्याचे आहे का? असाही सवाल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे.
अजित पिंगळे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांचा घरोबा भाजपाशी सर्वाधिक जवळचा असल्याने त्यांच्याकडे स्वत:चे असे व्हिजन काही असल्याचे दिसून येत नाही. त्यांनी भाजपा आमदार राणाजगजीतंिसह पाटील यांच्या मुद्यांचा वापर प्रचारात केला आहे. त्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारातील मुद्याच्या स्क्रिप्टचा वापर त्यांच्याकडून होत असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. विशेष म्हणजे नुकतेच उद्धव ठाकरे यांची आमदार कैलास पाटील यांच्यासाठी प्रचार सभा झाली. या प्रचार सभेच्या पूर्वसंध्येला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाच सवाल केले होते.
यामध्ये त्यांनी हिम्मत असेल तर मुख्यमंत्र्यांनी या पाच प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आवाहन ठाकरे यांना केले होते. वास्तविक हे पाच मुद्दे पिंगळे यांचे होती की, त्यांना इतरांनी तयार करुन दिले होते. याबाबत मतदार संघात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण जे पाच मुद्दे होते त्यामध्ये कुलस्वामिनी तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावरती आणण्यासाठी धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला राज्य सरकारच्या वाट्याचा ५० टक्के हिस्सा का नाकारला? दहा हजार रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या कौडगाव एमआयडीसीबाबत आपण साधी बैठक लावण्याची तसदी का घेतली नाही? धाराशिव जिल्ह्याला नवसंजीवनी मिळवून देणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कोणापुढे गुडघे टेकून रखडवला? आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा व्यापक विकास करण्यासाठी आपण काय केले? पीक विम्यासारख्या तळमळीच्या प्रश्नावर मुजोर विमा कंपन्यांना जाब विचारण्यासाठी बैठक लावण्याची धमक का दाखवली नाही? असे असे पाच मुद्दे पिंगळे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले होते.
वास्तविक हे मुद्दे राणाजगजितसिंह पाटील यांनी मागील अनेक वर्षापासून विरोधकांना विचारले आहेत. त्याच मुद्यांची अजित ंिपगळे यांच्याकडून पुनरावृत्ती सुरु आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आमदार राणाजगजितंिसह पाटील यांच्या व्हिजनची स्क्रिप्ट ते वाचून दाखवत असल्याचे नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.