17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसोलापूरसोलापूर एसटी स्टॅड परिसरात खड्डयात रस्ता

सोलापूर एसटी स्टॅड परिसरात खड्डयात रस्ता

सोलापूर : सोलापूर शहराच्या एसटी स्टॅडवरून बाहेर पडण्यासाठी यंत्र विभागाच्या बाजूने बुधवारपेठेतून रस्ता देण्यात आलेला आहे. हा रस्ता अंत्यत खराब असून या खड्डेमय रस्त्यातून दररोज सातशे बस बाहेर पडत आहेत.

कोणत्याही शहराचा चेहरा हा बस स्थानकावरून ओळखला जातो. मात्र सोलापूरचे बसस्थानक हे अत्यंत दाटीवाटीचे झालेले असून बस स्थानकातून बाहेर पडण्यासाठी पूर्वीपासून असलेला रस्ता हा बंद ठेवण्यात आला असून मागील बाजूने रस्ता देण्यात आला आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने या रस्त्यावरून बस बाहेर पडताना प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरातील कोणत्याही खासगी वाहनाने बस स्थानकात जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. बस स्थानकाच्या समोरील रस्ता दुभाजकातून कोणतेही गाडी आत घेता येत नाही. शहरातून बस स्थानकात जाण्यासाठी गॅस पंपापासून परत यावे लागते. मागील बाजूचा रस्ता व्यवस्थित असता तर मागील बाजूच्या रस्त्याचा खासगी वाहनासाठी वापर करता येऊ शकला असता. यामुळे अनेक दुचाकीस्वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विरुद्ध दिशेने प्रवास करत आहेत.

शहरातील प्रत्येक बसचा प्रवेश मुख्य प्रवेशद्वारातून आत आली तरी बाहेर पडताना खड्डेमय रस्त्यातूनच बाहेर जावे लागत आहे. यामुळे शहरात ये-जा करणा-या प्रत्येक प्रवाशाला धुळीचे लोट अंगावर घेऊनच जावे लागत आहे. विशेष म्हणजे याची मागणी काही बस प्रवेशही करतात. या मार्गावर अनेक बंद बस उभ्या करण्यात आल्याने मार्ग अडचणीचा झाला आहे. सम्राट चौकातून शेळगीसह पूर्व भागात जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने अनेक खासगी वाहने, रिक्षा यांचीही वर्दळ या मार्गावर असते. मात्र, हा रस्ता अत्यंत खराब आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR