परभणी : जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. मानवत पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप बोरकर व अधिकारी, अंमलदार यांनी मानवत पोलिस वसाहतीत वड, पिंपळ, जांभूळ, जांब, आंबा, कदंब अशा स्वदेशी वृक्षाची लागवड केली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व अधिकारी, अंमलदार यांना वृक्ष जोपासणा करण्यासाठी एक झाड दत्तक देण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक परदेशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षा रोपणासारखे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. मानवत येथील ठाणेदार संदीप बोरकर तसेच पोस्टे मानवत येथील अधिकारी/ अमलदार दिगंबर पाटील, किसन पतंगे, भारत नलावडे, अतुल पंचांगे, भारत सावंत, मधुकर चट्टे, धनंजय गायकवाड, शेख जावेद, नारायण सोळंके, गोविंद वड, नरेंद्र कांबळे, कैलास डुकरे, विजय लबडे, महेश रणेर, सुनील बावरी, फैयाज सय्यद, शफिक शेख, राजू इंगळे, प्रकाश खंदारे, प्रल्हाद वाघ, संतोष चव्हाण, भगीरथ जाधव, बंकट लटपटे, सावजी यांनी मानवत पोलिस वसाहत येथे लिंबाचे, वडाचे, पिंपळाचे, जांभळाचे, जांब, आंबा, कडुलिंबू, कदंब अशा सर्व स्वदेशी झाडांच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले.