नागपूर : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रविवारी (ता. ३० मार्च) नागपूरच्या दौ-यावर आले आहेत. या दौ-याच्या माध्यमातून ते नागपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रविवारी नागपूरच्या दौ-यावर आले आहेत. या दौ-याच्या माध्यमातून ते नागपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. परंतु या कार्यक्रमाआधी मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रविवारी (ता. ३० मार्च) नागपूरच्या दौ-यावर आले आहेत. या दौ-याच्या माध्यमातून ते नागपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शहरातील माधव नेत्रालयमधील नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. परंतु, या कार्यक्रमाआधी मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे, तब्बल ११ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडगेवार स्मृति भवनात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी त्यांनी संघाच्या पदाधिका-यांशी सुद्धा संवाद साधला.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान होऊन ११ वर्षे झाली आहेत. त्यांची पंतप्रधानपदाची तिसरी टर्म सुरू आहे. नागपुरात अनेकदा दौरे करून सुद्धा पंतप्रधान मोदी हेडगेवार स्मृतिस्थळी गेले नव्हते. पण यंदा मात्र गुढीपाडव्याच्या दिवशीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ कार्यालयात पोहोचल्याने या दौ-याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संघ मुख्यालयातून रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर आगमनापूर्वीच संघप्रमुख मोहन भागवत रेशीमबागेत दाखल झाले होते. संघाच्या परंपरेनुसार येणा-या पाहुण्यांचे स्वागत स्थानिक पदाधिकारी करतात. त्या नात्याने आज हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.