28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयतामिळनाडूतील विषारी दारू प्रकरण; मृतांचा आकडा ६१ वर

तामिळनाडूतील विषारी दारू प्रकरण; मृतांचा आकडा ६१ वर

चेन्नई : वृत्तसंस्था
तामिळनाडू येथील कल्लाकुरिची जिल्­ह्यात विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा ६१ वर गेला आहे.
तामिळनाडू येथील कल्लाकुरिची जिल्­ह्यात विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा ६१ वर गेला आहे. अद्यापही ११८ बाधितांवर विविध रुग्­णालयांमध्­ये उपचार सुरू आहेत. १८ जून रोजी कल्लाकुरिची जिल्­ह्यात करुणापूरम येथे घडलेल्­या प्रकाराने राज्­यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे. या घटनेचा तपशीलवार अहवाल सादर करावा, अशी नोटीस तामिळनाडूचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना राष्­ट्रीय मानवाधिकार आयोगाने सादर केली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली दखल
तामिळनाडूतील विषारी दारू प्रकरणात सहा महिलांचाही मृत्­यू झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याची स्वत:हून दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी द्रमुक आणि विरोधी पक्षातील एआयएडीएमके यांच्यात राजकीय आरोप-प्रत्­यारोप सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR