27.8 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeसोलापूरनववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची १३ ठिकाणी नाकाबंदी

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची १३ ठिकाणी नाकाबंदी

सोलापूर : सरत्या २०२३ वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शहरभर होणारा जल्लोषामुळे शांततेला गालबोट लागू नये यासाठी शहरभर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यात ७० ठिकाणी स्टॅटिक पाईंट, १३ ठिकाणी नाकाबंदी, तसेच स्ट्रॉयकिंग फोस, दंगा नियंत्रण पथक असा ७३५ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त (क्राईम) डॉ. दीपाली काळे यांनी पत्रकारांना दिली. ३१ डिसेंबर २०२३ हा कॅलेंडरमधील शेवटचा दिवस. मध्यरात्रीनंतर नव्या वर्षाला सुरुवात होणार असल्याने शहरात निरोप आणि स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तरुणाई जल्लोष करतात.

उत्साही मंडळी रात्रीच्या वेळी वाहनांवर, पायी रस्त्यावर फिरतात. अतिउत्साहींमुळे अपघातासारख्या घटना घडतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरवासीयांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना शांततेला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
ध्वनिमापक ध्वनिमाप तपासणीसाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.
वाहनधारकांची तपासणी मद्य प्राशन करून कोणी वाहन चालविताना आढळल्यास त्यांची ब्रिथ अ‍ॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
शहरामध्ये रस्त्यावर नियंत्रण करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटिसाठी व्यवस्था केली आहे. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक वाँच ठेवणार आहे.

शहरात ७० ठिकाणी 3 स्टेटिक पाईंट, तसेच १३ ठिकाणी नाकाबंदी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सात रस्ता, नई जिंदगी, या ठिकाणी स्ट्रॉयकिंग फोर्स व दंगा काढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. रस्त्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी महिला गस्ती पथक, दामिनी पथक नेमले आहे. कोणी असे कृत्य करताना आढळले तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.नियंत्रण पथक नेमण्यात आले आहे.
आक्षेपार्ह मजकूर, मेसेज व्हायरल करू नयेत. सोशल मीडिया सव्हॅलन्स पथकाची करड़ी नजर असणार आहे.तीन पोलिस उपायुक्त, ६ सहायक पोलिस आयुक्त, २२ पोलिस निरीक्षक, ४६ सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ७३५ पोलिस अंमलदार असतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR