25.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील बडतर्फ पोलिस अधिकारी पुन्हा सेवेत रुजू

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील बडतर्फ पोलिस अधिकारी पुन्हा सेवेत रुजू

पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पोलिस खात्यातून बडतर्फ झालेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा पोलिस दलात रुजू झाल्याची माहिती मिळत आहे. एका पोलिस अधिका-यासह चौघा जणांना पुन्हा पोलिस दलात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून ड्रग्जची तस्करी करणा-या ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मदत केल्याच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलिस हवालदार राजेश जनार्दन काळे, नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

मात्र आता या बडतर्फ केलेल्या अधिका-यांसह पोलिस कर्मचा-यांना पुन्हा गृह विभागाने पोलिस दलामध्ये समाविष्ट करून घेतले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रग्जची तस्करी करत होता. या प्रकरणात ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासोबत पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचा सहभाग आढळल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. आता पुन्हा पोलिस दलाच्या सेवेत त्यांना समाविष्ट करून घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR