सोलापूर – देशभरात तसेच सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना शहरातील ९२ हजार ५७६ बालकांना पोलिओचा – डोस देण्यात आला. एकूण ८६ टक्के बालकांना हा डोस देण्यात आला आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम २०२४ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्या देवी प्रसूती गृह ओपीडी विभाग न येथे आज राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमेस महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, प्रजनन माता बाल संगोपन अधिकारी डॉ. वैशाली शिरशेट्टी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ आशिष बोराडे, बाल रोग संघटना सोलापूरचे अध्यक्ष डॉ. आण्णासाहेब लोखंडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. सोडल आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेमध्ये एकूण १ लाख ७ हजार ५२६ बालकांपैकी आज शहरातील ९२ हजार ५७६ बालकांना पोलिओचा डोस दिला आहे. प्रवास करणाऱ्या बालकांना पोलिओ लस पाजण्यासाठी एस टी स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनं, मंदिरे, मॉल , टोल नाके इत्यादी सार्वजनिकठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली होती.
पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी महापालिकेच्या कार्यक्षेत्रासाठी ३८० लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली. साधारणपणे १०८९ आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक व खाजगी वैद्यकीय संघटना आदींच्या प्रयत्नातून ही मोहिम राबविण्यात आली आहे. काही कारणांनी बुथवर येऊ न शकलेल्या बालकांना दि. ४ ते ८ मार्च या कालावधीत त्यांच्या घरोघरी जाऊन पोलिओ लस देण्यात येणार आहे. ही मोहीम महापालिका आयुक्त उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी यांचे मार्फत राबवली जाणार आहे. एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रत्येक स्तरावर घेण्यात येत आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण घरांची संख्या २ लाख १५ हजार ८७७ इतकी असून दि. ४ ते ८ मार्च या कालावधीत घरोघरी जाऊन वंचित लाभार्थ्यांना पोलिओ डोस देण्यासाठी आय पी पी आय टीम संख्या २१६, ट्रान्सीट टीम ७६ व मोबाईल टीम २० कार्यरत असणार आहेत.