23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयकुवेतमध्ये राजकीय संकट; अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त

कुवेतमध्ये राजकीय संकट; अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त

कुवेत सिटी :  कुवेतचे अमीर शेख यांनी शुक्रवारी देशाची संसद बरखास्त केली. कच्च्या तेलाच्या खाणींनी संपन्न असलेला आखाती देश कुवेतमध्ये नवे राजकीय संकट उभे राहिले आहे. कुवेतच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीर यांनी संसद बरखास्त केल्यानंतर काही सरकारी विभाग आपल्या नियंत्रणाखाली ठेवले आहेत. याशिवाय अमीर यांनी देशातील काही कायद्यांचाही भंग केल्याची माहिती आहे. अमीर यांने नॅशनल असेंब्ली बरखास्त करण्याचे आणि घटनेच्या काही कलमांना चार वर्षांहून अधिक काळ स्थगित करण्याचे आदेश जारी केले आहेत. अमीर शेख मेशाल अल अहमद अल जबर यांच्याकडून देशाच्या संसदेवर संपूर्ण वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

कुवेत गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत राजकीय वादांनी वेढला गेला आहे. देशाची वेल्फेयर स्कीम म्हणजे कल्याणकारी व्यवस्था ही संकटातील प्रमुख समस्या आहे. कारण या योजनेमुळे सरकारला कर्ज घेण्यापासून रोखले जाते. यामुळे तेलसाठ्यातून प्रचंड नफा मिळत असला तरी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचा-यांना पगार देण्यासाठी सरकारी तिजोरीत फारच कमी पैसा शिल्लक राहतो. इतर अरब देशांप्रमाणे कुवेतमध्येही शेख असलेली राजेशाही व्यवस्था आहे, परंतु येथील विधिमंडळ शेजारील देशांपेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते.

कुवेत सध्या कठीण काळातून जात आहे. देशाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि देशाचे हित सुरक्षित राखण्यासाठी कठोर निर्णय घेण्यास संकोच केला जाणार नाही,” असे अमीर यांनी संसद विसर्जित करण्याची घोषणा करताना सरकारी टीव्हीच्या मुलाखतीत सांगितले. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे, भ्रष्टाचारामुळे देशातील वातावरण बिघडत आहे. दुर्दैवाने, सुरक्षा आणि आर्थिक संस्थांमध्ये भ्रष्टाचार पसरला आहे. तसेच न्याय व्यवस्थेतील भ्रष्टाचार आहे असेही अमीर म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR