नवी दिल्ली : यूपीएससीकडून कारवाई करण्यात आलेली पूजा खेडकर हिच्या अटकेसाठी पोलिस मागावर आहेत. दोन दिवसांपूर्वी काही माध्यमांनी ती परदेशात पळून गेल्याचे म्हटले होते. ती दुबई येथे गेल्याचे म्हटले जात होते. परंतु तिच्याबद्दल ताजी माहिती पुढे येत आहे.
दरम्यान, पूजा खेडकर हिचा जामीन अर्ज दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टाने नामंजूर केला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मात्र पूजा नॉट रिचेबल असल्याने पोलिसांना तिचा शोध आहे. पूजा खेडकर भारतातातच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ती दुबईला गेल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पूजा खेडकर ही भारतातच आहे.
दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र सरकार, एम्स हॉस्पिटल आणि मसुरी सेंटरकडून पूजाबद्दल माहिती मागितली आहे. पूजाने सादर केलेल्या कागदपत्रांबद्दलची माहिती पोलिसांना हवी आहे. सगळी कागदपत्रे पोलिसांकडे आल्यानंतर पोलीस पूजाला चौकशीसाठी बोलवणार आहेत.