17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रलंकेंना मारण्यासाठी पूजा

लंकेंना मारण्यासाठी पूजा

आईचे खळबळजनक आरोप

नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाल्याचे पाहायला मिळाले. महायुतीला १७ तर महाविकास आघाडीला ३० जागांवर यश मिळाले आहे. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनीही अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखे-पाटील यांचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. निलेश लंकेंनी अहमदनगरमध्ये मोठा उलटफेर केला. या निकालानंतर लंकेंच्या आईंनी खळबळजनक आरोप केले आहेत.

निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असून मोठी पूजा घातल्याचे लंके यांच्या आईने म्हटले आहे. तर निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती कारण हे मोठे लोक आहेत मशिनमध्ये घोटाळा करू शकतात अशी चर्चा होती, एवढंच नाही तर कुठे अपघात व्हावा यासाठी मोठमोठ्या पूजा घालण्यात आल्या असल्याचा खळबळजनक आरोप लंके यांच्या आई शकुंतला लंके यांनी केला आहे.

अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील तर मविआकडून निलेश लंके यांना तिकिट देण्यात आले होते. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार होते. तर लंके विद्यमान आमदार. शरद पवार गटाकडून उभे असलेल्या निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजयश्री मिळवली. ग्रामपंचायतपासून सुरू झालेला लंके यांचा प्रवास आता खासदारकीपर्यंत पोहोचला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR