मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन आणि अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. ती ३२ वर्षांची होती. कॅन्सरने तिचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
आज सकाळी पूनमच्या इन्स्टाग्रामवरुन तिच्या निधनाबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये तिचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण होती. आपल्या सर्वांची लाडकी पूनम पांडेंचा सर्व्हिकल कॅन्सरने निधन झाले आहे, हे सांगण्यात आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. या काळात आम्हाला एकांताची गरज आहे असे पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. पूनमच्या निधनाच्या वृत्ताला तिच्या मॅनेजरनेही दुजोरा दिला आहे. पूनमने २०१३ साली नशा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने अनेक सिनेमांतही काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे १.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. अनेकदा तिच्या व्हीडीओमुळेही पूनम चर्चेत असायची. तिच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.