25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeराष्ट्रीयबिहारच्या सारणमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार, गोळीबारात एकाचा मृत्यू

बिहारच्या सारणमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार, गोळीबारात एकाचा मृत्यू

सारण : निवडणुकीनंतर बिहारमधील सारणमध्ये आज हिंसाचार उसळला. या दरम्यान झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यूही झाला आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान झाले. याच काळात बिहारमधील सारण लोकसभा जागेवरही मतदान झाले. या जागेवर राजीव प्रताप रुडी हे भाजपचे उमेदवार आहेत, तर रोहिणी आचार्य राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) उमेदवार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदान संपण्यापूर्वी रोहिणी आचार्य बूथ क्रमांक ११८ वर पोहोचल्या होत्या. यावेळी गदारोळ झाला. या गदारोळावरूनच आज छपराच्या भिखारी ठाकूर चौकात पुन्हा हिंसाचार उसळला आणि दोन्ही पक्षांमध्ये गोळीबार झाला. यामध्ये तिघांना गोळ्या लागल्या. यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर भिखारी ठाकूर चौकाजवळ मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाचव्या टप्प्यात बिहारमधील पाच जागांवर मतदान झाले. सारण व्यतिरिक्त सीतामढी, मधुबनी, मुजफ्फरपूर आणि हाजीपूर या मतदारसंघात मतदान झाले. या टप्प्यात बिहारमध्ये एकूण ५२.९३ टक्के मतदान झाले.

सारणचे एसपी गौरव मंगला काय म्हणाले?

२० मे रोजी मतदानाच्या दिवशी आरजेडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज काही लोकांनी गोळीबार केला. या घटनेत तीन जणांना गोळ्या लागल्या, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. दोन जण रुग्णालयात दाखल आहेत. ज्या लोकांनी ही घटना घडवली, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, सारणमध्ये दोन दिवस इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR