32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeराष्ट्रीयप्रज्वल रेवण्णाला अटक

प्रज्वल रेवण्णाला अटक

बंगळुरु विमानतळावर पोहोचताच ठोकल्या बेड्या कर्नाटक पोलिसांची कारवाई

बंगळुरु : जेडीएसमधून निलंबित करण्यात आलेला हसन लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि महिला अत्याचार प्रकरणात फरार असलेला प्रज्वल रेवण्णा अखेर जर्मनीतून भारतात दाखल झाला. कर्नाटक पोलिसांनी बंगळुरु विमानतळावर पोहोचताच प्रज्वल रेवण्णाला अटक केली. बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल रेवण्णा पोहोचताच त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला इंटरपोलने गुरुवारी प्रज्वल रेवण्णाच्या भारतात येण्यासंदर्भात माहिती दिली होती. यानंतर बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेसाठी पूर्वतयारी करुन ठरली होती. बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीने प्रज्वल रेवण्णा भारतात पोहोचताच अटकेची कारवाई केली. आता प्रज्वल रेवण्णा बंगळुरु पोलिसांच्या कोठडीत आहे.

प्रज्वल रेवण्णाने २७ एप्रिलला देश सोडून पलायन केले होते. हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दुस-या दिवशी तो फरार झाला होता. इंटरपोलने बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीला प्रज्वल रेवण्णा जर्मनीतून म्युनिक विमातळावरुन निघाल्याची माहिती दिली होती. बंगळुरु पोलिसांच्या विनंतीवरुन इंटरपोलने प्रज्वल रेवण्णाला ब्लू कॉर्नर नोटीस देखील काढण्यात आली होती.

कर्नाटक पोलिसांना इंटरपोलचे सहकार्य
शुक्रवारी म्हणजेच ३१ मे रोजी मध्यरात्री १२.४९ वाजता प्रज्वल रेवण्णाचे विमान बंगळुरु विमानतळावर दाखल झाले. जर्मनीतून ते विमान भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी ३.३५ वाजता निघाले होते. यासंदर्भात इंटरपोलने कर्नाटक पोलिसांना माहिती दिली होती.

विमानतळावर चोख बंदोबस्त
प्रज्वल रेवण्णाने एसआयटी चौकशीसाठी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहणार असल्याचे म्हटले होते. बुधवारी प्रज्वल रेवण्णाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बंगळुरु पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर बंदोबस्त वाढवला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR