22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट; डॉक्टर निलंबित

ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूट; डॉक्टर निलंबित

बंगळुरू : सरकारी रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये होणा-या पत्नीसोबत प्री-वेडिंग फोटोशूट केल्याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. ऑपरेशन थिएटरमध्ये फोटोशूट करणे डॉक्टराला चांगलेच भोवले. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्हयातील सरकारी रुग्णालयात ही घटना घडली. घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी शुक्रवारी डॉक्टरला सेवेतून बडतर्फ केल्े.

डॉ. अभिषेक यांनी नुकतेच सरकारी रूग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट केले. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, डॉक्टर अभिषेक हे एका रुग्णावर शस्त्रक्रिया करत आहेत आणि त्यांची होणारी पत्नी त्यांच्यासमोर उभी राहून त्यांना मदत करत असल्याचे दिसते. शेजारी उभे असलेले इतर सहकारी हसत आहेत आणि ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली जात आहे तोही उठून बसतो आणि जोरात हसायला लागतो. लक्षणीय बाब म्हणजे ज्याच्यावर शस्त्रक्रिया करत असल्याचे दाखवण्यात आले तो खरा रुग्ण नव्हता, शुटींगसाठी नाटक करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR