18.8 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. गेल्या वर्षी पहिल्यांदाच प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला. मुंबई महापालिकेची निवडणूक अजूनही झालेली नसल्याने, यंदा सलग दुस-या वर्षी प्रशासकांनीच अर्थसंकल्प सादर केला. २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पाचा एकूण आकार ५९९५४.७५ कोटी रुपये आहे. मुंबई महानगर पालिकेच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ५९ हजार ९५४ कोटी रुपयांची, तर शिक्षणासाठी यंदा ३१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर मुख्य भर देण्यात आला आहे. मुंबई स्वच्छ, हिरवीगार आणि जगण्यासाठी आकांक्षी ठेवण्यासाठी नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी ३१७७४.५९ कोटींची सर्वोच्च पायाभूत सुविधा तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रम’ डिसेंबर २०२३ पासून हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेला मार्गदर्शन करण्यासाठी बीएमसी नं ६१ गुणांची मानक कार्यप्रणाली विकसित केली आहे. मुख्यमंत्र्यांचे झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी सर्व बीएमसी रुग्णालयांमध्ये लागू होणार आहे. औषधांच्या वेळापत्रकात सर्व आवश्यक औषधे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना
बीएमसी कार्यक्षेत्रात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य. त्यासाठी १११.८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, १६०० बचत गटांना प्रति गट १ लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांच्या स्वच्छतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बीएमसीने ७ जून २०२३ रोजी मुख्यमंत्र्यांची स्वच्छ मुंबई हेल्पलाइन सुरू केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अर्बन ग्रीनिंग प्रोजेक्ट या योजनेअंतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR