16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडराष्ट्रपती मुर्मू बुधवारी नांदेड दौ-यावर

राष्ट्रपती मुर्मू बुधवारी नांदेड दौ-यावर

उदगीर येथील बुद्धविहाराच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती

नांदेड : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुद्ध विहाराचा उद्घाटन कार्यक्रम बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी होत असून या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थित राहणार आहेत. उदगीर येथे जाण्यापूर्वी त्यांचे नांदेड विमानतळावर सकाळी १०.२५ वाजता आगमन होईल. त्यानंतर सकाळी १०.३५ वा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या हेलिकॉप्टरने उदगीर येथील बुद्धविहार उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रयाण करतील.

बुद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान व शासन आपल्या दारी या संयुक्त अभियान त्या सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे याच्यासह मंत्रिमंडळातील विविध सदस्य उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR