22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय साखर संघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील बिनविरोध

राष्ट्रीय साखर संघ अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील बिनविरोध

मुंबई : राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांनी निवड झाली. ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपची सत्ता आली आहे. राज्यसभा तिकिट नाकारल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे.

काही दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, गुरूवारी उमेदवारांची यादी समोर आली यात अशोक चव्हाण यांचे नाव समोर आले. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनवर्सन करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

हर्षवर्धन पाटील यांची २०१९ मध्ये राष्ट्रीय साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली होती. दरम्यान, आता पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर पहिल्यांदाच भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात आहे, राज्यातील राजकारण सहकारी कारखान्याच्या माध्यमातून चालते, त्यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर संघ ही एक महत्वाची संस्था आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR