18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींची कच्छमध्ये जवानांबरोबर दिवाळी

पंतप्रधान मोदींची कच्छमध्ये जवानांबरोबर दिवाळी

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. यंदा त्यांनी गुजरातमधील कच्छ येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळील सर क्रीक येथील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली.

यावेळी मोदी म्हणाले की सीमांबाबत एका इंचाच्या भूमीचीही तडजोड भारत करणार नाही. देशाचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण दले मजबूत आहेत. लोकांचा संरक्षण दलांवर विश्वास आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लडाखमध्ये भारत-चीन सैन्यमाघारी आणि गस्तीसंबंधी झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. देशाच्या संरक्षण दलांकडे शत्रू पाहतात, तेव्हा शत्रूच्या घातकी योजना संपुष्टात येतात असे सांगून मोदी म्हणाले देश सुरक्षित आहे, असे नागरिकांना तुमच्यामुळे वाटते. सीमा सुरक्षा दल, लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे जवान पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.

नक्षलवाद्यांचा बीमोड आवश्यक
दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी देशात एकीचे बळ वाढवावे’, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतिनिमित्त त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे त्यांना आदरांजली वाहिली. ‘जंगलातील नक्षलवाद संपत असल्यामुळे शहरी नक्षलवाद्यांचे नवे प्रारूप तयार होत आहे. शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना नेस्तनाबूत करण्याची गरज आहे’, असे मोदी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR