30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeराष्ट्रीयप्रियंका गांधींनी घेतली साक्षी मलिकची भेट

प्रियंका गांधींनी घेतली साक्षी मलिकची भेट

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरुवारी (काल) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज साक्षी मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया देखील उपस्थित होता.

भारतीय कुस्ती महासंघच्या निवडणुका काल गुरुवारी पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले आहेत. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेऊन कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याची मोठी घोषणा केली.

निवडणुकीत ब्रिजभूषण यांचा माणूस विजयी झाला, असं साक्षी मलिकने सांगितले. यावेळी साक्षीला अश्रू देखील अनावर झाले. कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर साक्षी मलिकला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. आज संध्याकाळी उशिरा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी साक्षी मलिकला भेटायला आल्या. दोघांची ही भेट साक्षीच्या घरीच झाली. यावेळी प्रियंका गांधींनी साक्षी मलिकच्या भावना ऐकून घेतल्या. या भेटीनंतर मी एक महिला म्हणून इथे आली आहे, कारण साक्षीसोबत जे काही झाले ते चुकीचे आहे, असं प्रियंका गांधींनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR