24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीसामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

सामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

पूर्णा : तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन पिंपळगाव बाळापुर कर्मचारी संघ ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते. या सामान्य स्पर्धेत ११० विद्यार्थ्यांपैकी ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पिंपळगाव येथील अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृह येथे दि. २४ डिसेंबर रोजी ही सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना लगेच बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी इयत्ता १ली तील विद्यार्थी नारायण गोविंद बनसोडे, मनोज माणिक बनसोडे, श्रेया लक्ष्मन बनसोडे, इयत्ता २री स्वराज माणिक बनसोडे, रूद्राणी नारायण बनसोडे, मयुरेश बालाजी बनसोडे, यश देवानंद घाटोळ, इयत्ता ३री समर्थ सुदामा बनसोडे, अश्विनी विश्वनाथ बनसोडे, धनश्री ज्ञानेश्वर बनसोडे, जान्हवी गोविंद बनसोडे, इयत्ता ४थी सम्राट भोजाजी बनसोडे, देविका देवानंद घाटोळ, शिवनेरी भानुदास घाटोळ, इयत्ता ५वी अर्थव लक्ष्मन बनसोडे, प्रतिक्षा प्रकाश बनसोडे, राधिका पांडुरंग बनसोडे, शिवम बालाजी बनसोडे, इयत्ता ६वी बनार्ली शंकर दास, शुभम अंगद बनसोडे, सुष्टी ज्ञानेश्वर जमरे, संध्या मुंजाजी बनसोडे, इयत्ता ७वी विठठ्ल तूकाराम आव्हाड, वेदिका गंगाधर बनसोडे, अजित रामचंद्र बनसोडे, हरिओम मोहनराव बनसोडे विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

कर्मचारी संघ पिंपळगाव बाळापुर यांच्या वतीने आठवड्यातील रविवारी या दिवशी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी तसेच विद्यार्थ्यांना ज्ञान वाढावे यासाठी या सामान्य ज्ञान स्पधेर्चे आयोजन केले जाणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.लक्ष्मन बनसोडे, संजय बनसोडे शा.शि.स. अध्यक्ष निवृत्त बनसोडे, गजेंद्र रेनगडे, प्रा.बालाजी बनसोडे, माणिक बनसोडे, मारुती बनसोडे, कामाजी बनसोडे, विजय घाटोळ, शालेय शिक्षण समितीचे सदस्य आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR