17.6 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeपरभणीगंगाखेड येथे श्रीराम प्रभू मुर्तीची सोमवारी मिरवणूक

गंगाखेड येथे श्रीराम प्रभू मुर्तीची सोमवारी मिरवणूक

गंगाखेड : शहरातील व्यापारी बांधवांच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने दि. २२ जानेवारी रोजी श्रीराम प्रभूच्या मुर्तीची वाद्य वृंदासह भव्य मिरवणुक काढण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी गजानन महाजन यांनी दिली आहे.

श्रीराम जन्मभूमी अयोध्येत दि. २२ रोजी श्रीराम प्रभू यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने दि. १७ रोजी शहरातील नवा मोंढा येथील मारुती मंदिरात व्यापारी बांधवांची बैठक संपन्न झाली. शहरातील पोलीस स्टेशन येथून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, डॉ. हेडगेवार चौक, दिलकश (श्रीराम) चौक मार्गे मुख्य रस्त्याने भगवती मंदिरापर्यंत श्रीराम प्रभू मूर्ती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीत सजीव देखावे, ढोल ताशाच्या गजर, पूर्ण बाजारपेठेत रांगोळी सजावटीचा समावेश आहे. दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता पोलीस स्टेशनपासून निघणा-या मिरवणुकीचे दुपारी १२ वाजता भगवती चौकात आरती करून सांगता करण्यात येणार आहे.

त्यानंतर प्रसाद वाटप होणार असून शहरातील व्यापारी बांधवांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक गजानन महाजन, रमेश औसेकर, मनोज नाव्हेकर, अतुल गंजेवार, नंदकुमार सोमाणी, माऊली डाके, सचिन कोटलवार, जगदीश तोतला, पप्पू नळदकर, अनिल यानपल्लेवार, सुभाष नळदकर, गोविंद निरस, शुभम पेकम, नरू नळदकर, ज्ञानेश्वर महाजन, मनीष यानपल्लेवार, आनंद धोका, व्यंकट रेवणवार, प्रवीण कंधारकर, रतन माणिकवार, दगडू सोमाणी आदींनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR