28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रशहरात प्री-पेड मीटरचा भडका

शहरात प्री-पेड मीटरचा भडका

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळला

नागपूर : प्रतिनिधी
शहरात प्री-पेड मीटरच्या विरोधात चांगलाच भडका उडाला असून, बुधवारी व्हेरायटी चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून प्री-पेड मीटर रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

समाजातील कुठल्या घटकाशी चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलवून प्री-पेड मीटर लावले जात आहेत. या माध्यमातून ग्राहकांच्या खिशातून हजारो कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत.

या विरोधात नागपुरात प्री-पेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीतर्फे जनाक्रोश अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून व्हेरायटी चौकात प्री-पेड मीटरच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. समितीचे सदस्य आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच प्री-पेड मीटर रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी फडणवीस यांचा पुतळा जाळल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR