करमाळा : प्रतिनिधी
भारत शेती विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे औषध फवारणीचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे नियोजन केंद्र सरकारच्या वतीने केली असून या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान देत आहेत असे मत आदिनाथ चे प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांनी व्यक्त केले. भारत विकास कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या खत कंपनीच्या वतीने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने संपूर्ण करमाळा तालुक्यात ड्रोन द्वारे औषध फवारणी करण्याचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात असे अत्याधुनिक ड्रोन प्रत्येक ग्रामपंचायतला व सहकारी संस्थेला अनुदानावर देण्यात येणार आहेत.करमाळा तालुक्यातील 86 गावात येणाऱ्या वीस दिवसात हे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ पांगरे येथील गावातून झाला.आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय संचालक संजय गुटाळ यांच्या हस्ते रोड उडवण्यात आले. या माध्यमातून ऊस केळी द्राक्षे अशा पिकांवर कीटकनाशकेची फवारणी करण्यात आली.
राष्ट्रीय केमिकल्स च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वतीने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना या द्वारे फवारणीचे प्रशिक्षण देण्यात येत असून येणाऱ्या काळात कंपनी व शासनाच्या वतीने अनुदानावर ड्रोन देण्यात येणार आहेत. पांगरे गावातील प्रगतशील शेतकरी रामेश्वर पारेकर पाटील चदुआबा पाटील भारत टेकाळे भैय्या मणेरी शहाजी राजे टेकाळे चेतन पाटील भारत जाधव ओम जाधव मंगेश पाटील व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.