27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

पुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई (प्रतिनिधी) : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्य सरकारने तसा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी विनंती मोहोळ यांनी यावेळी केली.

आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत. विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे, अशी माहिती मोहोळ यांनी एक्स या समाज माध्यमातून दिली.

पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांचे आजोळ होते त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचे नाते जिव्हाळ्याचे होते शिवाय लोहगावच्या गावक-यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणे, हे अधिक समर्पक असणार आहे, असे मोहोळ यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR