25.4 C
Latur
Wednesday, November 20, 2024
Homeमहाराष्ट्र‘पुण्यात’ बस्तान मांडलेल्या कव्हेकरांच्या ‘जेएसपीएम’ विरोधात आंदोलन

‘पुण्यात’ बस्तान मांडलेल्या कव्हेकरांच्या ‘जेएसपीएम’ विरोधात आंदोलन

पुणे : प्रतिनिधी
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) या संस्थेने लातूर पॅटर्नचा गोडवा गात पुणे येथे आपले बस्तान बसवले आहे. याच पुण्यात गुरुवारी याच संस्थेच्या लातूरातील वस्तीगृहात तेरा वर्षीय अरविंद खोपे या विद्यार्थ्याच्या झालेल्या संशयीत मृत्यू प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढून प्रंचड घोषणाबाजी करत अखिल भारतीय बौध्द समाजाच्या वतीने या गुन्ह्यातील दोषींना त्वरीत अटक करावी व चिमुकल्या अरविंदच्या खोपे कुटूंबियांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.

माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संस्थेने पुण्यात लातूर पॅटर्नचे गोडवे गात पुणे येथे आपले बस्तान मांडले आहे. याच जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संचलित लातूर येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. २९ जुलैच्या रात्री घडली.

याप्रकरणी गरूवार दि. १ ऑगस्ट गुरूवार रोजी अखिल भारतीय बौध्द समाजाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी या अंदोलनातील सहभागी आंदोलकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत पुरोगामी महाराष्ट्रात दलीत बांधवावर अन्याय अत्याचार वाढेले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अरविंद खोपे अमर रहे.., दलितांवर होणारे अन्याय अत्याचार थांबलेच पाहिजेत, अरविंदच्या मारेक-यांना त्वरीत अटक करा अशी घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. या अंदोलनात मोठ्या प्रमाणात महीला व नागरिक सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR