लातूर : प्रतिनिधी
सोमवारी दुपारी अहमदपूर – लातूर या एसटी बसला आष्टामोड जवळील नांदगाव पाटी नजीक भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच आपदग्रस्तांना सर्वतोपरी तात्काळ मदत करण्यासंबंधी व त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी , लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व इतर संबंधितांना दिल्या आहेत.
सोमवारी दुपारी चाकूर तालुक्यातील आष्टांगोड जवळील नांदगाव पाटील नजीक दुचाकीला चुकवण्याच्या प्रयत्नात एसटीबस अपघातग्रस्त झाली, या अपघाताची माहिती मिळताच, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी वेगवेगळ्या यंत्रणांना दूरध्वनी करून अपघातासंदर्भात माहिती घेतली, बस मध्ये एकूण ३६ प्रवासी होते त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एक महिला अधिक गंभीर जखमी असल्याची माहिती त्यांना मिळाली असता, सर्व जखमींना लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, महाविद्यालयात दूरध्वनी करून जखमी रुग्ण ते पोहोचण्यापूर्वीच उपचाराच्या सुविधा उभारण्याच्या सूचना आमदार देशमुख यांनी दिल्या, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी युद्ध पातळीवर पातळीवर यंत्रणा उभारून जखमी रोहन रुग्णालयात पोहोचताच त्यांच्यावर तातडीने चार सुरू केले.
आमदार अमित देशमुख यांनी अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना व जखमींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, त्यांना सर्व प्रकारची मदत पोहोचवावी अशी सूचना लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांना दिल्या, त्याप्रमाणे अॅड. समद पटेल, लक्ष्मण कांबळे, विजय देशमुख प्रवीण कांबळे व सहकार्यांसह तातडीने रुग्णाला जाऊन जखमींची विचारपूस केली असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. आमदार अमित देशमुख यांनी या अपघाताच्या संदर्भाने जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशीही संपर्क केला, अपघातातील जखमींना आवश्यक ते उपचार आणि मदत मिळण्याचे दृष्टीने कारवाई करावी असे त्यांना सांगितले आहे, दरवर्षी उन्हाळ्याच्या या दिवसात अपघाताच्या प्रमाणात वाढ होते, आता उन्हाळा सुरू होत आहे.
त्यामुळे या दिवसात अपघात वाढू नयेत यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी, लोकजागृती करावी, वाहतुकीला शिस्त लावावी, अवैध वाहतुकीला आळा घालावा यासह उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत, नांदगाव पाठीनजीक झालेल्या अपघातात एसटी बस चालकाने अचानकपणे पुढे आलेल्या दुचाकी चालकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे, मात्र हे करत असताना एसटी अपघातग्रस्त झाली आहे, त्यामुळे महामार्गावर आणि सर्वच रस्त्यावर प्रत्येक वाहनधारकांनी वाहतूक नियमाचे पालन करून स्वत:चे व इतरांचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे बनले आहे. यापुढे सर्वच वाहनधारक अशी काळजी घ्यावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.