परभणी : पुर्णवाद संगीत कला अकादमीच्या वतीने दि. ५ ते ७ जानेवारी दरम्यान परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजीत पूर्णवाद संगीत संमेलनाचे उदघाटन शुक्रवार, दि.५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता प.पु. डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सुप्रसिध्द सतारवादक उस्मान खॉ साहेब यांच्या हस्ते सुरमनी डॉ. कमलाकररावजी परळीकर परभणी यांना जीवन गौव पुरस्कारने सन्मानीत करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शहरातील शिवाजी चौक येथून सकाळी ९.३० वाजता भव्य शोभायात्रा निघार आहे. ही शोभायात्रा गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदीर-नारायण चाळ- विसावा कॉर्नर, छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून वसमत रोड मार्गे अक्षदा मंगल कार्यालयाकडे पोहचणार आहे. अतीशय सुसज्ज फुलांनी सजविलेल्या या रथात दुर्मीळ वाद्यासह संगीत विषयावरील अनेक ग्रंथ असणार आहेत. याच बरोबर अरबिंदो अक्षरज्योती इंग्रजी शाळेतील विद्यार्थी, विद्याथीर्नी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग राहणार असून विद्यार्थी विविध वेषभूषेचे या शोभायात्रेत आकर्षण राहणार आहेत.
यात लेझीम पथक, टाळ मृदंग, यांच्यासह वारकरी संप्रदायाचे अनेक मान्यवरांसह नागरीक सहभागी होणार आहेत. या शोभायात्रेसह उदघाटन सोहळ्यास भावीक भक्तासह गुरुबंधू आणि रसीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ॐ पुर्णवादी संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा तथा पुर्णवाद संगीत संमेलनाच्या संयोजीका सु.श्री. डॉ. संगीता गुणेश पारनेरकर यांच्यासह स्वागताध्यक्ष एकनाथ (अनिल) मोरे, भागवत खोडके, शीशी अय्यर, व्यंकटेश कुरूंदकर, श्रीकांत देशपांडे, एच.एम. कुलकर्णी, गणेश जोशी, विनय मोहरीर, मल्हारीकांत देशमुख व समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.