25.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeक्रीडापीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात

पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात

पॅरिस : पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदकांवर नाव कोरले आहे. दरम्यान, आज भारताची स्टार बॅटंिमटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिकपदक विजेत्या पीव्ही सिंधूचा सामना झाला. या सामन्यात चीनच्या हे बिंग जिओ हिने सिंधूचा २१-१९, २१-१४ असा पराभव केला. या पराभवासह पीव्ही सिंधूचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

भारतातील लाखो-करोडो चाहते पीव्ही सिंधूच्या सामन्याकडे डोळा लावून होते. पण, आज तिने चाहत्यांची निराशा केली. सिंधूने पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिली, पण दुस-या गेममध्ये चीनच्या हे ंिबग जिओने मोठ्या फरकाने सामना आपल्या नावावर केला. या पराभवासह सिंधूचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील आव्हानही संपुष्टात आले आहे. तसेच, तिचे ऑलिम्पिक पदकांची हॅट्रिक साधण्याचे स्वप्नही भंगले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR