22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयक्विनने मारली राजकुमारावर बाजी; मंडीमधून कंगना रानावत विजयी

क्विनने मारली राजकुमारावर बाजी; मंडीमधून कंगना रानावत विजयी

मंडी : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी पार पडलं. यंदाच्या निवडणुकीत कोण विजयाचा गुलाल उधळणार? आणि कोणाचा पराभव होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाची उमेदवार कंगना रानावत ही विजयी झाली आहे. कंगनाने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा पराभव केला.

मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये गेली ७१ वर्ष काँग्रेसचा दबदबा पहायला मिळाला आहे. १९५२ पासून काँग्रेसने १२ वेळा ही जागा जिंकली आहे. विक्रमादित्य सिंह यांचे वडील वीरभद्र सिंह हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. २०२१ मध्ये वीरभद्र सिंह यांचे निधन झाले. विक्रमादित्य यांच्या आई प्रतिभा सिंह या विद्यमान खासदार आहेत. या जागेवर विक्रमादित्य सिंह यांच्या कुटुंबाचे वर्चस्व गेली काही वर्ष पहायला मिळत आहे. पण २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या राम स्वरूप शर्मा यांनी विजयाचा गुलाल उधळला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR