22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रजोगेश्वरी पूर्व मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत राडा

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत राडा

 मुंबई : प्रतिनिधी
जसजसा मतदानाचा दिवस जवळ येत आहे, तसतशी निवडणुकीतील प्रचाराची रंगत वाढत आहे. राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. काहीसा असाच प्रकार बुधवारी भल्या पहाटे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात पाहायला मिळाला. या मतदारसंघात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार अनंत (बाळा) नर यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. शिवसेनेच्या उमेदवार मनीषा वायकर यांच्या समर्थकांकडून महिलांवर मारहाण झाल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केला.

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, जोगेश्वरी पूर्व येथील उबाठा पक्षाचे उमेदवार बाळा नर यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिलांवर हल्ला केला. त्यांचा व्हीडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे कपडे फाडले. नखाने त्यांना मारण्यात आले आहे. आमच्या महिला भगिनींची गाडीसुद्धा त्यांनी फोडली. घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक लोक होते.

हे सर्व काय आहे? ही कशा पद्धतीची गुंडागर्दी आहे? हे कशासाठी करत आहेत. कारण, हार होणार असल्याचे त्यांना माहीत आहे. निवडणूक ते पूर्वीच हरले आहेत. त्यांना एक भीतीचे वातावरण निर्माण करायचे आहे. महाराष्ट्रामध्ये शांत पद्धतीने निवडणुकीचे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये बाधा निर्माण करायची आहे.

महिलांवर हात उचलला?
शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांमध्ये जबाब नोंदवायचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहितीसुद्धा शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. उबाठाच्या लोकांनी हिंदु दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व विचार सोडले आहेत. बाळासाहेब, आम्हा महिलांना रणरागिणी म्हणायचे. त्या महिलांवर हात उचलला आहे.

आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप
शिवेसेनेने (उद्धव ठाकरे) जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात आचारसंहिता भंग होत असल्याचा आरोप केला. तसेच सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले, आचारसंहिता भंग होत असताना आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या गुंडांनी जोगेश्वरी पूर्व येथील मातोश्री क्लबवर दगडफेक केली. अशा घटनाबा आणि लाजिरवाण्या कृतीवर कठोर कारवाई करावी ही विनंती.

तिथे महिला कार्यकर्त्या नव्हत्या : वायकर
या प्रकरणावर बोलताना जोगेश्वरी पूर्वचे शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार बाळा नर म्हणाले, शीतल म्हात्रे यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, त्या दरम्यान तिथे महिला कार्यकर्त्याच नव्हत्या. आम्ही कुठल्याही महिलेला अशा पद्धतीची वागणूक दिली नाही. ते आमच्या रक्तातच नाही. व्हीडीओमध्ये बांबू फेकण्यात आले आहेत, असे दिसते. ते बाहेरून फेकले गेले आहेत. आम्ही मातोश्रीच्या आत होतो. याबाबत रवींद्र वायकर हे पत्रकार परिषद घेत आहेत. त्या परिषदेनंतर योग्य ते उत्तर दिले जाईल, असेही बाळा नर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR