33.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रहातकणंगलेत रघुनाथ पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

हातकणंगलेत रघुनाथ पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज, गुरुवारी भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे या मतदारसंघात आता पंचरंगी लढतीचे चित्र आहे. पाटील यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.

रघुनाथ पाटील म्हणाले, मतदारसंघातील जवान व शेतकरी बरोबर असल्याने मला कोणाचे आव्हान वाटत नाही. राजू शेट्टी व साखर कारखानदारांनी मिळून शेतक-यांचे नुकसान केले असून खासदार धैर्यशील माने हे पाच वर्षे कुठे होते, हे जनताच विचारत आहे.

सत्यजित पाटील-सरुडकर यांचे वडील आमदार होते. त्यामुळे मीच खरा शेतक-यांचा प्रतिनिधी असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पोपटराव दाते, डॉ. प्रगती चव्हाण, अ‍ॅड. माणिक शिंदे, ज्योतिराम घोडके व विजय पाटील उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR