28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयसोरेन यांच्या स्वीय सचिवाच्या घरी छापे

सोरेन यांच्या स्वीय सचिवाच्या घरी छापे

रांची : वृत्तसंस्था
झारखंडमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे स्वीय सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर आयकरने छापा टाकला. आयकर विभागाने सुनीलकुमार श्रीवास्तव आणि त्याच्या साथीदारांच्या १७ ठिकाणांवर छापे टाकले. रांचीमध्ये ७ आणि जमशेदपूरमध्ये ९ ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे पडत आहेत. यामध्ये जमशेदपूरच्या अंजनिया इस्पातसह इतर ठिकाणांचाही समावेश आहे. झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. त्या अगोदरच ही कारवाई झाली.

विधानसभा निवडणुकीत हवालाच्या मदतीने पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यावर २६ ऑक्टोबर रोजी आयटीने रांची, जमशेदपूर, गिरिडीह आणि कोलकाता येथील ३५ ठिकाणी छापे टाकले. या काळात १५० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. छाप्यात सापडलेल्या रकमेची व्यापा-यांच्या खात्यांच्या वह्यांशी जुळणी करून ७० लाख रुपये जप्त करून बँकेत जमा करण्यात आले. हे सर्व झारखंडच्या निवडणुकीशी जोडले गेले आहे. या छाप्याचाही याच्याशी संबंध जोडला जात आहे.

यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी १२०० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खाण घोटाळ््यात सीबीआयने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या पंकज मिश्रा यांच्या जवळच्या १६ ठिकाणी छापे टाकले होते. या कालावधीत तपास यंत्रणेने ६० लाख रुपये रोख, एक किलो सोने, १.२५ किलो चांदी आणि ६१ जिवंत काडतुसे जप्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR