27.3 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeराष्ट्रीयसाबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले

साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला आहे. बनारसहून अहमदाबादला जाणा-या साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे कानपूर-भरतपूर दरम्यान, रुळावरून घसरले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ट्रेन कानपूरहून झाशीसाठी निघाली असताना ही घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या घटनेनंतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

या घटनेची माहिती देताना रेल्वेने सांगितले की, झाशी विभागातील कानपूर-भीमसेनच्या गोविंदपुरी स्थानकाजवळ आज पहाटे अडीच वाजता बनारसहून अहमदाबादला जाणारी साबरमती एक्स्प्रेस क्रमांक १९१६८ रुळावरून घसरली. या अपघातात कोणत्याही प्रकारे जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही . रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था केली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले जात आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अपघातस्थळी पोहोचले असून, अधिकारी नियंत्रण कार्यालयातून घटनेची माहिती घेत आहेत.

अपघातामागे कट असण्याची शक्यता ?

उत्तर प्रदेशातील वाराणसीहून गुजरातची राजधानी अहमदाबादकडे जाणा-या साबरमती एक्स्प्रेसला काल रात्री अपघात झाला. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या अपघातामागे कट असण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करून म्हटले की, अपघाताचे पुरावे सुरक्षित आहेत. आयबी आणि यूपी पोलिसही या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR