हैदराबाद : सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मागील चार ते पाच तासांपासून हैरदराबादमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. कव्हर्समुळे मैदान कव्हर्सने झाकण्यात आले, पण पावसाने विश्रांती घेतलीच नाही. थोडावेळ पावसाने विश्रांती घेतली, कव्हर्स काढण्यात आले. सामना सुरु होणार असेच वाटत होते. पण पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा कव्हर्स मैदानावर टाकण्यात आले.
मुसळधार पाऊस थांबण्याचे नाव न घेतल्यामुळेच पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. गुजरातचा सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. याआधीचा कोलकात्याविरोधातील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. गुजरातचे १४ सामन्यात १२ गुण झाले आहेत. गुजरातचा अखेरचा सामनाही पावसामुळे रद्द झाला आहे.
सनरायजर्स हैदराबादचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. हैदराबाद आणि गुजरात संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला. हैदराबादचे १३ सामन्यात आता सात विजयासह १५ गुण झाले आहेत. १५ गुणांसह हैदराबादच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला. हैदराबादचा अखेरचा सामना पंजाबविरोधात होणार आहे. हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये पोहचणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चौथा संघ कोणता असेल, याकडे आता नजरा लागल्या आहेत. आता चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्याकडे चाहत्यांच्या नजरा असतील. या दोन्हीतील एक संघ प्लेऑपमध्ये दाखल होणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. पण याचा फटका पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना बसला आहे. हे दोन्ही संघ आता स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. त्यांच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत. हैदराबादचा दोन्ही सामन्यात दारुण पराभव झाला असता, तर दिल्ली आणि पंबाज या संघाना प्लेऑफच्या आशा होत्या. पण सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे या दिल्ली आणि लखनौचे आव्हान संपुष्टात आलेय. याआधी मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि गुजरात यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पाच संघाचे प्लेऑफचे आव्हान संपुष्टात आले आहे. तीन संघाचं प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले आहे. आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील एक संघ प्लेऑफमध्ये दाखल होणार आहे.