23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पाऊस पुन्हा जोरदार हजेरी लावणार

राज्यात पाऊस पुन्हा जोरदार हजेरी लावणार

हवामान खात्याचा अंदाज

पुणे : राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये कोकण, विदर्भासह अन्य काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे असल्याने राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पावासाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर गुरुवारी (ता. ४) जोरदार सरींची शक्यता आहे, तर विदर्भात वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. कोल्हापुरातील आजरा येथे येथे सर्वाधिक १११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. राज्याच्या अनेक भागांत ऊन-सावल्यांच्या खेळात उन्हाचा चटका वाढला आहे. मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून रोहतक, लखनौ, बालिया, पूर्णिया, ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. यातच पाकिस्तानपासून बांगलादेशपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वा-याची स्थिती आहे. गुजरात ते केरळ किना-याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने किना-यालगत ढग जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर गुरुवारी जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींसह पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

जोरदार पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
(येलो अलर्ट) आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR