मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या पावसाचे दिवस सुरू असले तरीही काही भागांमधून मात्र पावसाने काढता पाय घेतल्यामुळे चांगचील तापमानवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार हे चित्र ऑगस्टच्या अखेरपर्यंत पाहायला मिळणार असून सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता असून, राज्यात मात्र सर्वत्र पावसाने उघडीप दिली आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण कमी होत गेले आणि ऑगस्टमध्ये त्याने दडीच मारली. पण, आता मात्र मुंबईत पावसाच्या ढगांची पुन्हा दाटी होताना दिसत आहे.
इथे पावसाची रिमझिम अधूनमधून सुरू असतानाच तिथे पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा एकदा उकाडा मात्र वाढला आहे. कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि राज्याच्या इतर भागांमध्येही हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक भागांमध्ये उकाडा अस होताना दिसत आहे. हेच चित्र पुढील काही दिवस मुंबई, ठाण्यासह पालघर भागातही दिसणार असून, इथेही पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.