27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंनी जाहीर केली मनसेची ४५ जणांची यादी

राज ठाकरेंनी जाहीर केली मनसेची ४५ जणांची यादी

मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसेने आज जाहीर केलेल्या ४५ उमेदवारांच्या यादीत अमित ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. अमित ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंच्या सदा सरवणकरांचं आव्हान असेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र माहीममधून अद्याप उमेदवार जाहीर केला नाही.

यापूर्वी पंढरपुरातून दिलीप धोत्रे आणि मुंबईतील शिवडीतून बाळा नांदगावकर यांची नावे राज ठाकरेंनी जाहीर केली होती. त्यामुळे यादीनंतर मनसेचे आतापर्यंत एकूण ४७ उमेदवार जाहीर झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्ती थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांच्यापुढे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सदा सरवणकर यांचे आव्हान असेल.

वरळीतून आदित्य ठाकरे २०१९ साली लढले होते, त्यावेळेस मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यावेळी माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे हे मनसेचे उमेदवार घोषित झाले आहेत.
वरळीतून आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार असल्यानं आणि ठाकरे गटाकडून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्यानं, संदीप देशपांडे विरुद्ध आदित्य ठाकरे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

मनसेच्या यादीतले उमेदवार
कल्याण ग्रामीण मधून विद्यमान आमदार राजू पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राजू पाटील हे २०१९ ते २०२४ या कार्यकाळात मनसेचे एकमेव आमदार होते.

मनसेची संपूर्ण यादी
कल्याण ग्रामीण – प्रमोद (राजू) रतन पाटील
माहिम – अमित राज ठाकरे
भांडुप पश्चिम – शिरीष गुणवंत सावंत
वरळी – संदीप सुधाकर देशपांडे
ठाणे शहर – अविनाश जाधव
मुरबाड – श्रीमती संगिता चेंदवणकर
कोथरुड – किशोर शिंदे
हडपसर – साईनाथ बाबर
खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे
मागाठाणे – नयन प्रदीप कदम
बोरीवली – कुणाल माईणकर
दहिसर – राजेश येरुणकर
दिंडोशी – भास्कर परब
वर्सोवा – संदेश देसाई
कांदिवली पूर्व – महेश फरकासे
गोरेगांव – विरेंद्र जाधव
चारकोप – दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे
विक्रोळी – विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे
चेंबूर – माऊली थोरवे
चांदिवली – महेंद्र भानुशाली
मानखुर्द-शिवाजीनगर – जगदीश खांडेकर
ऐरोली – निलेश बाणखेले
बेलापूर – गजानन काळे
मुंब्रा-कळवा – सुशांत सुर्यराव
नालासोपारा – विनोद मोरे
भिवंडी पश्चिम – मनोज गुळवी
मिरा-भाईंदर – संदीप राणे
शहापूर – हरिश्चंद्र खांडवी
गुहागर – प्रमोद गांधी
कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी
आष्टी – कैलास दरेकर
गेवराई – मयुरी बाळासाहेब मस्के
औसा – शिवकुमार नागराळे
जळगांव शहर – डॉ. अनुज पाटील
वरोरा – प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे
कागल – रोहन निर्मळ
तासगांव-कवठे महाकाळ – वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा – संजय शेळके
हिंगणा – विजयराम किनकर
नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर
सोलापूर शहर-उत्तर – परशूराम इंगळे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR