24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंचा नेम नाही

राज ठाकरेंचा नेम नाही

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यातच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह घेण्यावरून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर टीका केली होती. त्यावरून आता शिंदे गटातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो असे संजय शिरसाट म्हणाले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, ते राज ठाकरे आहेत. ते कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी टॉप गिअर टाकतील याचा नेम नसतो. म्हणून ते त्यांची भूमिका त्यांच्या मर्जीने घेतात. कुणी सांगितले म्हणून भूमिका घेतली असे त्यांचे नसते. शिवसेनाप्रमुख जशा भूमिका घ्यायचे, तसे बेछूटपणे भूमिका घेण्याचा राज ठाकरे यांचा स्वभाव आहे. त्या स्वभावाला अनुसरून त्यांनी घेतलेली ती भूमिका आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR