23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयपेपरफुटी प्रकरणात राजस्थान देशात अग्रस्थानी

पेपरफुटी प्रकरणात राजस्थान देशात अग्रस्थानी

गुजरात, जम्मू काश्मीरही आघाडीवर

नवी दिल्ली : पहिला नीटचा पेपर फुटला नंतर नेटचा पेपर फुटला आणि देशभरात विद्यार्थी वर्गांत पुन्हा एकदा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. पेपर फुटण्याची किंवा कोणतीही परीक्षा वादात सापडण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अनेक वेळा असे घडले आहे. त्यानंतर पेपर रद्द तरी झाले किंवा त्यावर समिती बसून तपास करण्यात आला. गेल्या ७ वर्षांमध्ये १५ राज्यांमध्ये पेपरफुटीचे ७० प्रकरणे समोर आली आहेत.

यावेळी नीट परीक्षा २४ लाख मुलांनी दिली आणि पेपरफुटीचा त्यांना फटका बसला. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्याची केसदेखील न्यायालयात सुरू आहे.

राजस्थानमध्ये सर्वाधिक पेपरफुटीच्या घटना
गेल्या काही वर्षांत राजस्थानमध्ये सर्वाधिक पेपर लीक झाले आहेत. राजस्थानमध्ये सात परीक्षांचे पेपर फुटले असून त्याद्वारे ४०,५९० पदे भरायची होती. त्यामुळे याचा फटका ३८ लाख ४१ हजार उमेदवारांना बसला.

मध्य प्रदेश आणि तेलंगणा दुस-या क्रमांकावर
पेपर लीक प्रकरणात तेलंगणा आणि मध्य प्रदेश संयुक्तपणे राजस्थाननंतर दुस-या क्रमांकावर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये ५ पेपर लीक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तेलंगणामधी भरती परीक्षांद्वारे एकूण ३,७७० पदे भरायची होती आणि यामुळे ६,७४,००० उमेदवार अडचणीत आले होते. मध्य प्रदेशातही एकूण ५ प्रकरणे नोंदवली गेली ज्याद्वारे ३,६९० पदांवर भरती करायची होती. १,६४,००० उमेदवारांना या पेपरफुटीचा फटका बसला.

उत्तराखंड तिस-या क्रमांकावर
पेपर लीक प्रकरणात उत्तराखंड तिस-या क्रमांकावर आहे. १,८०० पदांच्या भरतीसाठी असलेले चार पेपर फुटले होते. या परीक्षेसाठी २,३७,००० उमेदवारांनी यासाठी अर्ज केले होते, त्यामुळे सर्वांना याचा फटका बसला.

गुजरात चौथ्या क्रमांकावर
पेपर फुटीमध्ये गुजरात आणि बिहार ही दोन राज्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. बिहार आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये पेपर लीकची एकूण तीन प्रकरणे समोर आली आहेत. बिहारमध्ये २४,३८० आणि गुजरातमध्ये ५,२६० पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. बिहारमधील सुमारे २२ लाख ८७ हजार उमेदवारांना याचा फटका बसला. तर गुजरातमध्ये या परीक्षांमध्ये सुमारे १६ लाख ४१ हजार उमेदवारांना पेपरफुटीचा फटका बसला.

जम्मू आणि काश्मीर पाचव्या स्थानावर
पेपर फुटीच्या या यादीतील पुढचे नाव जम्मू-काश्मीरचे आहे. या राज्यांत एकूण ३ पेपर लीक प्रकरणे नोंदवली गेली ज्याद्वारे २,३३० पदांवर भरती होणार होती. या परीक्षांसाठी २,४९,००० उमेदवारांनी अर्ज केले होते आणि त्या सर्वांना याचा फटका बसला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR