32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रराम कृष्ण हरी वाजली तुतारी

राम कृष्ण हरी वाजली तुतारी

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

पुणे : एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. त्यांचा पराभव बस यही काफी है असा वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्याचे त्यावेळी तीव्र पडसाद उमटले होते. अजित पवारांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत माध्यमांनी सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडून प्रतिक्रिया दिली आहे. राम कृष्ण हरी वाजली तुतारी अशा शब्दात त्यांनी पाटलांना उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारत यंदाच्या लोकसभेत समाधानकारक जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला १० पैकी ८ जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळाली आहे. शरद पवारांनी पक्षाचे नवीन चिन्ह, नवीन नाव या जोरावर ८ जागा मिळवून दाखवल्या. पण अजित पवारांना हे जमले नसल्याचे निकालावरून दिसून आले. या निवडणुकीत देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आहे.

लाखांच्या लीडने सुप्रिया जिंकून आल्याने महाराष्ट्रात त्यांचे कौतुक केले जात आहे. या विजयी जल्लोषात सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर पुण्यात प्रथमच मार्केटयार्डात येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यभिषेक दिन निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथम मार्केटयार्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महायुतीने सुरुवातीच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR