20 C
Latur
Sunday, December 1, 2024
Homeसोलापूरकाव्यस्पर्धेत रामप्रभू माने यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

काव्यस्पर्धेत रामप्रभू माने यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

सोलापूर : निर्मला मठपती फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार सोहळा शिवस्मारक सभागृह सोलापूर येथे संपन्न झाला. विविध साहित्य प्रकारातील अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबरोबरच निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरांसह जिल्ह्यातील जवळपास ६५ कवी सहभाग घेतला होता. त्यातील प्रथम द्वितीय तृतीय असे तीन नंबर काढण्यात आले.विजेत्याना सन्मान चिन्ह, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये तृतीय आसादे द्वितीय म्हमाने तर रामप्रभू माने यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रृती वडगबाळकर प्रमुख पाहुणे नसीमा पठाण परीक्षक राजेंद्र भोसले सुत्रसंचलन सौ.वंदना कुलकर्णी प्रतिष्ठान अध्यक्ष शिवांजली स्वामी ,सचिन उत्तरेशवर मठपतीसह मठपती फाउंडेशनची सर्व टीम उपस्थित होती. तसेच कवीवर्य बद्दिउज्मा बिराजदार शिवाजी शिंदे संध्या धर्माधिकारी जमोद्दीन शेख दत्तात्रय इंगळे मयुरेश कुलकर्णी डॉ. स्मिता पाटील वनिता घोडके सह अनेक साहित्यिक रसिक श्रोत्ये उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR