मुंबई : बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आईबाबा झाले आहेत. रणवीर-दीपिकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दीपिकाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कालच दीपिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज दीपिका आणि रणवीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच दीपिका आणि रणवीरने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता ते आईबाबा झाले आहेत. दीपिकाने त्यांच्या पहिल्या लेकीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्माने दीपिका-रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दीपिकाने गणेशोत्सवाच्या दुस-या दिवशी गोंडस लेकीला जन्म दिला. गणेश चतुर्थीला रणवीर आणि दीपिका सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर दीपिकाला मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात चिमुकलीचे आगमन झाले आहे. रणवीर-दीपिका आईबाबा झाल्याने चाहतेही आनंदी आहेत.