22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeपरभणीरासेयो शिबिरातून सामाजिक उतराई होण्याची प्रेरणा मिळते : प्रा. डॉ. विशाल पतंगे

रासेयो शिबिरातून सामाजिक उतराई होण्याची प्रेरणा मिळते : प्रा. डॉ. विशाल पतंगे

पूर्णा : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ख-या अर्थाने सामाजिक उत्तराई होण्याची प्रेरणा मिळत असते असे प्रतिपादन प्रा.डॉ.विशाल पतंगे यांनी केले.

स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वार्षिक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पांगराचे सरपंच उत्तमराव ढोणे यांनी केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी यांनी मांडले. पुढे बोलताना प्रा. डॉ. पतंगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी चार भिंतीच्या बाहेरच जग अनुभवले पाहिजे. रासेयो शिबिरातून श्रमाचा आणि साहसी जीवनाबद्दलचा दृष्टिकोन मिळतो. हाच दृष्टिकोन आपल्यावर सामाजिक संस्कार करत असतो असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जायचे असल्यास कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

या कार्यक्रमासाठी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नामदेवराव ढोणे, शालेय समितीचे अध्यक्ष रमेश ढोणे, विठ्ठलराव ढोणे, सखाराम ढोणे, निवृत्ती ढोणे, अर्जुन ढोणे, शिवाजी ढोणे, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक, रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिपमाला पाटोदे तर आभार प्रा. डॉ. किर्तनकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR