22.1 C
Latur
Saturday, March 1, 2025
Homeमहाराष्ट्रपोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती

महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना सरकारने क्लीन चिट दिली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची पोलिस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्याने रश्मी शुक्ला यांच्यावर दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हे दोन्ही एफआयआर नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. पुण्यात काँग्रेस नेते नाना पटोले तर मुंबईत संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन रेकॉर्ड करण्यात आले होते. दरम्यान, पुणे फोन टॅपिंग प्रकरणात फिर्यादीद्वारे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला होता. तर दुसरीकडे कुलाबा प्रकरणी शुक्ला यांच्यावर खटला चालवण्यास राज्य सरकारने मंजुरी देण्यास नकार दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR