21.6 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रपालकमंत्रिपदावरून कोल्हापुरात ‘रस्सीखेच’

पालकमंत्रिपदावरून कोल्हापुरात ‘रस्सीखेच’

कोल्हापूर : प्रतिनिधी
राज्यात महायुतीने बंपर यश मिळवल्यानंतर आता महायुती सरकारमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाला मंत्रिपद मिळणार? याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोण सांभाळणार? याकडेही जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत. कोल्हापूरला शिवसेनेच्या माध्यमातून अजून एकदाही पालकमंत्रिपद मिळाले नाही. मात्र, यंदा तीन जागा जिंकल्यामुळे शिवसेनेकडे पालकमंत्री पद जाणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात दमदार यश मिळवलेल्या महायुतीने इतिहासात पहिल्यांदाच १० विधानसभा सदस्य निवडून आणत निर्विवाद वर्चस्व मिळवले. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पालकमंत्रिपद भूषवले आहे.

मात्र आता जिल्ह्यातील ३ जागा धनुष्यबाणावर निवडून आणत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाला पालकमंत्रिपद हा यापूर्वीचा फॉर्म्युला असल्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर, चंद्रदीप नरके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून अमल महाडिक आणि राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ मंत्रिपदाच्या रेसमध्ये असणार.

शिवसेना पालकमंत्रिपदावर करणार दावा
२०१९ च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सतेज पाटील दुस-यांदा पालकमंत्री झाले, तर राज्यातील दोन पक्षांत झालेल्या फुटीनंतर अस्तित्वात आलेल्या महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा दीपक केसरकर आणि त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळले. यंदाच्या विधानसभेत शिवसेनेच्या तीन जागा निवडून आल्यानंतर शिवसेना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR