17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeउद्योगआरबीआयने ठोठावला २ बॅकांसह ५ जणांना दंड

आरबीआयने ठोठावला २ बॅकांसह ५ जणांना दंड

३ वित्त कंपन्यांचा समावेश

मुंबई : सर्व बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआय कोणत्याही बँकेवर कारवाई करू शकते. गेल्या काही दिवसांपासून आरबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी आरबीआयने ५ मोठ्या कंपन्यांवर कारवाई केली आहे. या ५ कंपन्यांमध्ये २ बँका आणि ३ वित्त कंपन्यांचा समावेश आहे. आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई केली आहे.

आरबीआयने सीएसबी बँकेला १.८६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. वित्तीय सेवांच्या आऊटसोर्सिंगमधील जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहिता संबंधित काही सूचनांचे पालन न केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने युनियन बँक ऑफ इंडियाला १.०६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. युनियन बँकेला नो युवर कस्टमरशी (केवायसी) संबंधित काही नियमांचे पालन न केल्यामुळे आणि इतर कारणांमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोणत्या आहेत कंपन्या?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुथूट हाऊसिंग फायनान्सला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या गृहनिर्माण वित्त कंपन्या (रिझर्व्ह बँक)सूचना, २०२१ च्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल कंपनीवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. निडो होम फायनान्स लिमिटेड आणि अशोका विनियोग लिमिटेडलाही दंड ठोठावण्यात आला असून आरबीआयने ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर आरबीआयने अशोका विनियोग लिमिटेड कंपनीला ३.१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने म्हटले आहे की आर्थिक व्यवहारांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल या दोन कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR